

भिवंडी, ता. १५ (बातमीदार) : ‘खालदूम सेठ की चाळ’ परिसरात कपडे वाळत घालण्यावरून झालेल्या किरकोळ वादाने हिंसक वळण घेतले. दोन व्यक्तींनी एका दाम्पत्याला शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली, अशी पोलिसांकडे तक्रार केली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कादरीया अश्रफिया मदरसासमोर ‘खालदूम सेठ की चाळ’ येथे राहणारे तक्रारदार रमजान अहमद अख्तरअली अन्सारी (वय २९) यांचा गुरुवारी (ता. १२) रात्री सुमारे दहा वाजता कपडे वाळत घालण्यावरून वाद झाला. या वादादरम्यान कैफ ऊर्फ ‘बाबा’ अन्सारी आणि दानिश खान यांनी तक्रारदाराला मारहाण केली. तसेच, मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तक्रारदाराचा मित्र शाहरुख खान आणि तक्रारदाराची पत्नी मोनी खान यांनाही त्यांनी मारहाण केली. त्यांनी तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही दिली. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
---
मोबाईल चोरी
भिवंडी (बातमीदार) : भिवंडी-नाशिक महामार्गावरील डोंगरालीजवळ मोटारसायकलवरून आलेल्या दोन व्यक्तींनी एका व्यक्तीच्या हातातील सुमारे ३५ हजारांचा फोन हिसकावून नेला. भूषण परमानंद होटकर (वय ४०, रा. कल्याण पूर्व) हे १२ नोव्हेंबरच्या रात्री ठाण्याकडून नाशिकच्या दिशेने प्रवास करत होते. डोंगरालीजवळ दोन व्यक्तींनी मागून येऊन त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि तेथून पळ काढला. कोनगाव पोलिसांनी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.