पंधरा ग्रामपंचायतींचा गौरव

पंधरा ग्रामपंचायतींचा गौरव
Published on: 

पंधरा ग्रामपंचायतींचा गौरव
क्षयरोगमुक्तीच्या दिशेने वाटचाल; पहिल्या वर्षातील ब्राँझ पुरस्काराने सन्मानित
पेण, ता. १५ (वार्ताहर) : केंद्र शासनाच्या क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियानांतर्गत पेण तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींना पहिल्या वर्षातील ब्राँझ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. क्षयरोग नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत या ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. पेण पंचायत समितीच्या तालुका सभागृहात १३ नोव्हेंबरला पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. रायगड जिल्हा क्षयरोग नियंत्रण अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येत आहे.
केंद्र शासनाने दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या टीबीमुक्त ग्रामपंचायत व गाव अभियानाची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू आहे. आरोग्यवर्धिनी उपकेंद्रे, आरोग्यवर्धिनी केंद्रे आणि अन्य आरोग्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावर क्षयरोग नियंत्रणासाठी प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमांतर्गत पहिल्या वर्षात क्षयरोगमुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ग्रामपंचायतींना ब्राँझ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींमध्ये वाशी, वढाव, दिव-बोर्झे, काळेश्री, काराव, खरोशी, कोलेटी, वरेडी, अंतोरे, जिते, जोहे, वरवणे, झोतीरपाडा आणि तरणखोप या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

आरोग्य यंत्रणेचा सहभाग
पुरस्कार वितरण सोहळ्याला पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, गटविकास अधिकारी गजानन लेंडी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील नखाते, जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भस्मा, पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे, सदस्या प्रीती पाटील, मेघा पाटील उपस्थित होत्या. याशिवाय १५ ग्रामपंचायतींचे सरपंच, आरोग्य विभागाचे समीर सानप, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी आणि आशा कार्यकर्त्यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.