बिरसा मुंडा यांना सागरी भूमिपुत्र महासंघाच्या वतीने अभिवादन

बिरसा मुंडा यांना सागरी भूमिपुत्र महासंघाच्या वतीने अभिवादन
Published on: 

सामूहिक शेतीतून समृद्धीचा ध्यास
माळ येथे सागरी भूमिपुत्र महासंघाचा मेळावा यशस्वी
मुरबाड, ता. १६ (वार्ताहर) : आद्य क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त सागरी भूमिपुत्र महासंघाच्या वतीने माळ येथे अभिवादन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेल्या संघर्षाचे स्मरण करण्यात आले. यानिमित्त आयोजित शेतकरी उद्योजक मेळाव्यात आदिवासी शेतकरी आणि ग्रामीण समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

शेतकऱ्यांनी केवळ शेती उत्पादनापुरते मर्यादित न राहता उद्योजक बनावे, यासाठी शेतकरी गट स्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले. पेसा क्षेत्रातील व्यवसाय संधी, शासकीय योजना, सामूहिक शेती, शेतमालाचे मूल्यवर्धन, प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठ उपलब्धता या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

सागरी भूमिपुत्र महासंघाच्या मुरबाड तालुका समन्वयक डॉ. कविता वरे-भालके यांनी शेतकऱ्यांनी संघटित होऊन स्थानिक संसाधनांचा वापर करावा आणि शेतीपूरक लघुउद्योग उभारावेत, असे आवाहन केले. सामूहिक प्रयत्नांतून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि आर्थिक स्वावलंबनाच्या संधी निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संयोजन सविता शिंदे (सीआरपी, माळ) आणि समाजसेवक जयराम उघडा यांनी केले. या वेळी स्थानिक शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.