लहुजी साळवे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसह खेळाडूंचा सन्मान

लहुजी साळवे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसह खेळाडूंचा सन्मान
Published on: 

ठाणे, ता. १६ (बातमीदार) : आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २३२व्या जयंतीनिमित्त लहुजी शक्ती सेना (महाराष्ट्र राज्य), ठाणे जिल्ह्याच्या वतीने विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम घेण्यात आले होते. जय महाराष्ट्र नगर येथील संकल्प न्यू इंग्लिश स्कूल परिसरात हा जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात दानपट्टा आणि लाठीकाठी या साहसी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. ठाणे जिल्हा असोसिएशनचे बाळा साठे यांनी विद्यार्थ्यांना लाठीकाठी व दानपट्ट्याचे प्रशिक्षण दिले. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वह्यांचे वाटपही करण्यात आले. या वेळी डॉ. आशीष शिंदे यांनी लहुजी साळवे यांच्या जीवनकार्यावर विशेष व्याख्यान दिले. कार्यक्रमाला सभागृह नेते हनुमंत जगदाळे, नगरसेवक प्रशांत जाधवर, राजेंद्र सुवे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ समाजनेते आनंद शिंदे, अभंग शिंदे, सुरेश आवघडे, सुभाष यादव आणि प्रकाश बाबर यांनीही उपस्थिती लावली. सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सोनावले यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम झाला. लहुजी वस्ताद यांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देणे, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.