रेवस पोर्ट जमीन वापसी लढा विधानभवनाच्या दारात

रेवस पोर्ट जमीन वापसी लढा विधानभवनाच्या दारात
Published on: 

रेवस पोर्टविरोधात शेतकऱ्यांचा लढा तीव्र
सचिन अहिर यांना कृती समितीचे निवेदन
अलिबाग, ता. १६ (वार्ताहर) : रेवस पोर्ट लिमिटेडच्या ताब्यात असलेल्या आणि सध्या विनावापर पडून असलेल्या शेतजमिनी मूळ जमीनधारकांना परत मिळाव्यात, यासाठी रायगड जिल्हा विविध प्रकल्पग्रस्त हितकारी कृती समितीने पाठपुरावा तीव्र केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर आता या लढ्याची धग विधान भवनापर्यंत पोहोचली आहे. नुकतीच समितीच्या शिष्टमंडळाने विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांची मुंबईतील शासकीय निवासस्थानी भेट घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी केली.

कोकण परिषदेचे अध्यक्ष राजन गावंड यांच्या पुढाकारातून झालेल्या या भेटीत उपसभापती अहिर यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. तसेच जमिनी परत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या वेळी रायगड कृती समितीचे अध्यक्ष अॅड. प्रथमेश पाटील यांनी प्रकरणाची पार्श्वभूमी मांडली. जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, रेवस पोर्टच्या ताब्यातील विनावापर जमिनी कायदेशीर प्रक्रियेद्वारे मूळ शेतकऱ्यांच्या ताब्यात लवकरात लवकर देण्यासाठी विशेष लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली.

करंजा इन्फ्रा लिमिटेडच्या प्रकरणात शेतकऱ्यांना जमिनी परत करण्याचे आदेश झाल्याचा दाखलाही त्यांनी दिला. त्याच धर्तीवर रेवस पोर्टच्या जमिनींबाबतही निर्णय व्हावा, अशी भूमिका समितीने मांडली. यावर अहिर यांनी शेतकऱ्यांना जमिनी परत मिळवून देण्यासाठी निश्चितपणे मदत करण्याची ग्वाही दिली.

या शिष्टमंडळात कोकण परिषदेचे शासकीय संपर्क अधिकारी राज ठाकूर, सचिव अन्सार शेख, रायगड कृती समितीचे सदस्य दिलीप गावंड, वासुदेव गावंड, सागर पाटील, संजय मोकल, जयराम ठाकूर, मनोहर भगत, रामकृष्ण वेले, संतोष ठाकूर, विवेक मोकल, सुधीर म्हात्रे, नरेश पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.