

जोगेश्वरी, ता. १६ (बातमीदार) : जोगेश्वरी पूर्व येथील समर्थ एन्क्लेव्ह पुनर्विकास प्रकल्पातील घरखरेदीदारांच्या प्रलंबित प्रश्नांना अखेर खासदार रवींद्र वायकर यांच्याकडे वाचा फोडण्यात आली आहे. घरखरेदीदारांच्या प्रतिनिधींनी रविवारी (ता. १५) वायकर यांची भेट घेऊन विविध समस्यांचे निवेदन आणि संबंधित कागदपत्रे सादर केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वायकर यांनी तत्काळ महारेरा आणि संबंधित शासकीय कार्यालयांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. तसेच विकसकाला बोलावून प्रकरणाची कायदेशीर बाजू तपासावी आणि आवश्यक ती कारवाई करावी, असे निर्देश दिले.
समर्थ एन्क्लेव्हच्या एफ आणि जी विंगमधील पुनर्विकास प्रकल्पातील समस्यांबाबत ‘सकाळ’ने ११ जुलैच्या अंकात ‘पुनर्विकास प्रकल्पाला महारेराची तिसरी मुदतवाढ; सभासदांकडून सुविधांबाबत नाराजी’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. महारेराकडून तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळूनही सभासदांच्या अडचणी कायम असल्याचे या वृत्तातून समोर आले होते.
घरखरेदीदारांनी मोठ्या रकमा भरूनही करारानुसार सदनिकांचा ताबा मिळालेला नाही. भोगवटा प्रमाणपत्र (ओसी), अपूर्ण बांधकाम आणि आवश्यक सुविधांचा अभाव यांसारखे प्रश्नही अद्याप सुटलेले नाहीत. त्यामुळे त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
कारवाईकडे लक्ष
महारेरा अधिनियम २०१६ अंतर्गत घरखरेदीदारांच्या हिताचे संरक्षण अपेक्षित असताना वारंवार मुदतवाढ देण्याऐवजी विकसकाकडून करारातील अटींची पूर्तता करून घ्यावी, अशी मागणी सभासदांनी केली आहे. आता वायकर यांच्या हस्तक्षेपानंतर संबंधित यंत्रणा कोणती कारवाई करतात, याकडे घरखरेदीदारांचे लक्ष लागले आहे.
जाेगेश्वरी : पुनर्विकास प्रकल्पातील घरखरेदीदारांनी रवींद्र वायकर यांना निवेदन सादर केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.