

श्रमदानातून पाणी अडविले
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांचा पुढाकार
पोलादपूर, ता. १६ (बातमीदार) : महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पोलादपूर तालुक्यातील देवपूर येथे वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. प्रतिष्ठानचे विश्वस्त पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, रायगड भूषण डॉ. सचिनदादा धर्माधिकारी, उमेशदादा धर्माधिकारी आणि राहुलदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी श्री सदस्यांनी दिवसभर श्रमदान करून हा बंधारा उभारला.
श्री सदस्यांनी एकत्र येत वाळू आणि मातीने भरलेल्या गोण्यांच्या साह्याने बंधाऱ्याची निर्मिती केली. सध्या निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर या बंधाऱ्याचा देवपूर आणि परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. परिसरातील जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होण्याबरोबरच शेतीसाठीही काही प्रमाणात पाण्याची सोय होणार आहे. तसेच पाण्याच्या उपलब्धतेमुळे जनावरांसाठी चारा उत्पादनास मदत होणार आहे.
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण आणि बंधारे निर्मिती यांसारखे विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जातात. देवपूर येथे श्री सदस्यांनी केलेल्या श्रमदानाबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमाचे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, देवपूरचे सरपंच सिद्धेश्वर महाडिक आणि शिवसेनेचे तालुकाप्रमुख नीलेश अहिरे यांनी कौतुक केले. उपक्रमासाठी ग्रामसेविका शिल्पा कोंडाळकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
मथळे उपमथळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.