

मत्स्यव्यवसायातून स्वावलंबनाची संधी
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेत विविध घटकांचा समावेश; महाडीबीटीवर अर्ज प्रक्रिया सुरू
अलिबाग, ता. १६ (वार्ताहर) : मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा शाश्वत विकास साधून नीलक्रांतीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून मच्छीमार बांधव, मत्स्यव्यवसाय संस्था आणि लाभार्थ्यांना विविध घटकांसाठी अनुदान मिळणार आहे. रायगड जिल्ह्यातील इच्छुक मच्छिमारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाने केले आहे.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने ही योजना अमलात आणली आहे. यामध्ये सहा राज्यस्तरीय आणि १९ जिल्हास्तरीय योजनांचा समावेश असून, अस्तित्वातील तीन जिल्हास्तरीय योजनांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत तलावांची दुरुस्ती, गाळ काढणे, नवीन मत्स्यसंवर्धन तलाव बांधकाम, अस्तित्वातील तलावांचे पॉलीथिन अस्तरीकरण, जाळी व बिगर यांत्रिक नौकांसाठी अनुदान दिले जाणार आहे. तसेच महिलांसाठी हॅण्ड ग्लोव्हज व गमबूट, फिरते मासे विक्री केंद्र, शीतपेटीसह ई-बाईक, नौकांचे यांत्रिकीकरण, जीवरक्षक उपकरणे, मासळी विक्री साहित्य, सौर सुकवणी यंत्र आणि बर्फ कारखान्यांचे आधुनिकीकरण यांचाही समावेश आहे.
ऑनलाइन अर्जाची सुविधा
योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक लाभार्थ्यांना महाडीबीटी २.० पोर्टल वर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांनी आर्थिक स्वावलंबनासाठी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रायगड-अलिबाग जे. एस. पटेल यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.