

क्रीडा संकुलासाठी २० कोटीचा निधी मंजूर
बेलापूरमध्ये अद्ययावत सुविधा उभारणार; संपूर्ण खर्च राज्य शासन करणार
तुर्भे, ता. १६ (बातमीदार) : बेलापूर गावातील सेक्टर २० येथे आधुनिक इनडोअर क्रीडा संकुल उभारण्यासाठी राज्य शासनाने २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नगरविकास विभागाने ६ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. आमदार मंदा म्हात्रे यांच्या पुढाकारातून हा प्रकल्प साकारण्यात येणार असून, संपूर्ण खर्च राज्य शासन करणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका या कामाची अंमलबजावणी करणार आहे.
पर्यावरण व जलचाचणी प्रयोगशाळेमागील मोकळ्या भूखंडावर हे संकुल उभारले जाणार आहे. येथे बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम, व्यायामशाळा, योग व ध्यान केंद्रासह बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉलची सुविधा असेल. लहान मुलांसाठी स्वतंत्र खेळाचा विभागही प्रस्तावित आहे.
संकुल हरित इमारत संकल्पनेनुसार उभारण्यात येणार आहे. सौरऊर्जा, पावसाचे पाणी साठवण्याची यंत्रणा आणि वृक्षारोपणाचाही आराखड्यात समावेश आहे. भूखंड सध्या सिडकोच्या अखत्यारीत असून, तो महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल आणि आवश्यक मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे आमदार म्हात्रे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.