

घाटकोपर, ता. १६ (बातमीदार) : छठपूजा महोत्सवानिमित्त घाटकोपर पूर्व परिसरातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावांवर भाविकांनी अर्पण केलेल्या निर्माल्याचे संकलन करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या एन विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागाने विशेष स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेतून तब्बल ६.१ टन निर्माल्य जमा करण्यात आले. उपायुक्त संतोषकुमार धोंडे, सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा विभागाचे सहाय्यक अभियंता साजिद सौदागर यांच्या देखरेखीतून स्वच्छतेची मोहीम पार पडली.
उत्तर भारतीय भाविकांसाठी घाटकोपर पूर्वेतील आचार्य अत्रे मैदान, घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील साईनिवारा तसेच कामराज नगर पूर्व येथील एमएमआरडीए मैदानावर एन विभागाच्या वतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली होती. छठपूजेनंतर या तलावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा झाले होते. या निर्माल्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने विशेष नियोजन केले होते.
स्वच्छता मोहिमेसाठी एकूण १२० सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. कर्मचाऱ्यांनी तलाव परिसरातील निर्माल्य संकलित करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची कार्यवाही केली. धार्मिक उत्सव पार पडल्यानंतर परिसरात अस्वच्छता निर्माण होऊ नये, तसेच पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, यासाठी पालिकेकडून विशेष खबरदारी घेण्यात आली.
छठपूजेसाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्याबरोबरच उत्सवानंतर परिसर स्वच्छ ठेवणे हीदेखील पालिकेची महत्त्वाची जबाबदारी आहे. भाविकांनी अर्पण केलेल्या निर्माल्याचे योग्य संकलन आणि विल्हेवाट लावण्यासाठी १२० सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्यात आली.
- जयदीप मोरे, सहाय्यक आयुक्त, एन विभाग
घाटकाेपर : घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.