उरणमध्ये गोदामाला आग

उरणमध्ये गोदामाला आग
Published on: 

उरणमध्ये केमिकल गोदामाला आग
स्फोटांमुळे परिसर हादरला; धुरामुळे रहिवाशांना श्वसनाचा त्रास
उरण, ता. १६ (वार्ताहर) : उरण येथील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील प्लॅटिनम लॉजिस्टिकच्या गोदामाला सोमवारी (ता. १६) सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागली. गोदामात केमिकलचा साठा असल्याने आगीदरम्यान वारंवार स्फोट झाले. त्यामुळे परिसर हादरून गेला. आगीचे, धुराचे लोट परिसरात पसरल्याने रहिवाशांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. खबरदारी म्हणून अनेकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.

प्लॅटिनम लॉजिस्टिकच्या केमिकल गोदामाला सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर सिडको, पनवेल महापालिका आणि नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगदीश शेलकर यांनीही घटनास्थळी धाव घेत रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना दिल्या. आगीत गोदामातील माल खाक झाला. यात जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
.....
गोदामांतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत हद्दीत नियमांचे उल्लंघन करून कंटेनर यार्ड आणि गोदामे उभारण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. या गोदामांचे नियमित फायर ऑडिट होत नसल्याने आगीच्या घटना घडत असल्याची नाराजी रहिवाशांनी व्यक्त केली. निवासी वस्तीजवळील गोदामात ज्वलनशील केमिकलचा साठा करण्यास परवानगी कोणी दिली, असा सवालही उपस्थित होत आहे.
फोटो : MUM26F57798, MUM26F57797

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.