म्हसा-चेरवली पायी दिंडी आजपासून सुरू

म्हसा-चेरवली पायी दिंडी आजपासून सुरू
Published on: 

मुरबाड, ता. १७ (वार्ताहर) : कार्तिकी एकादशीनिमित्त नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र खांबलिंगेश्वर मंदिर, म्हसा ते श्री क्षेत्र गोरक्षनाथ मठ, चेरवली या २६व्या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या भक्तिमय सोहळ्याला बुधवार (ता. १८)पासून सुरुवात होणार असून, २२ नोव्हेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
पंचक्रोशीतील म्हसा, आंबेगाव, आंबेटेंभे, गवाळी, बोरिवली, कान्होळ, तोंडली, मोहघर, काचकोळी, सासणे, न्हावे, केदुर्ली, रावगाव, शेलारी, साजई, शिरवली, काकडपाडा, टेंभरे, मानिवली, अंबरनाथ, मुळगाव, नेरळ, कळंब, मुरबाड, शिवळे, सरळगाव, किन्हवली, चेरवली आदी गावांतील भाविकांच्या सहकार्याने हा सोहळा पार पडणार आहे.
बुधवारी सायंकाळी पाच वाजता म्हसा येथील खांबलिंगेश्वर मंदिरातून दिंडीचे प्रस्थान होईल. त्यानंतर हरिपाठ आणि ह.भ.प. केशव महाराज घरत यांचे प्रवचन होईल. गुरुवारी कान्होळ येथे नाश्ता, ह.भ.प. प्रकाश महाराज सासणे यांचे प्रवचन आणि न्हावे येथील श्रीराम मंदिरात दुपारचे भोजन होईल. सायंकाळी जगन पागधरे यांचे प्रवचन झाल्यानंतर किन्हवली येथे मुक्काम असेल.
शुक्रवारी मानिवली येथे ह.भ.प. केशव घरत यांचे प्रवचन आणि शिवळे येथे भोजन व्यवस्था आहे. सायंकाळी मुरबाड व शिवळे येथे विठ्ठल-रखुमाई मंदिरात लक्ष्मण महाराज शिंगोळे यांचे प्रवचन होईल. त्यानंतर मोहोप येथील ज्ञानोबा-तुकोबा मंदिरात दिंडीचा मुक्काम असेल. शनिवारी कार्तिकी एकादशीनिमित्त खापरी, शिवळे, पतंगरपाडा आणि किन्हवली येथे फराळ असणार आहे. रात्री नऊ ते पहाटे एक या वेळेत चेरवली मठात ह.भ.प. धनाजी महाराज भोईर यांचे कीर्तन होईल. त्यानंतर मुरबाड, शहापूर आणि अंबरनाथ येथील भजनी मंडळांचा जागर भजनाचा कार्यक्रम रंगणार आहे. रविवारी सकाळी नऊ ते ११ या वेळेत धनाजी महाराज भोईर यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे.

मान्यवरांकडे विविध जबाबदाऱ्या
सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ह.भ.प. रामभाऊ दळवी, दिंडीचालक म्हणून ह.भ.प. धनाजी महाराज भोईर, तर चोपदार म्हणून ह.भ.प. कडूशेठ कडव आणि काशीशेठ दळवी काम पाहणार आहेत. मार्गदर्शक म्हणून ह.भ.प. केशव महाराज घरत, तर विणेकरी म्हणून ह.भ.प. मंगल महाराज उगले आणि ह.भ.प. कमलाकर दळवी जबाबदारी सांभाळणार आहेत. विठ्ठल घिरी आणि गजानन घिरी यांनी दिंडीसाठी विनामूल्य ट्रकसेवा उपलब्ध करून दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.