नवी मुंबई महापालिका क्षेत्रात विशेष धुरीकरण मोहीम

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात विशेष धुरीकरण मोहीम
Published on: 

नवी मुंबईत विशेष धुरीकरण मोहीम
सहा गटांतून आरोग्य विभागाचे नियोजन

नेरूळ, ता. १७ (बातमीदार) : शहरातील डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखून डेंगी, मलेरिया यांसारख्या आजारांना आळा घालण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने विशेष धुरीकरण मोहीम हाती घेतली आहे. १६ ते २१ नोव्हेंबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत शहरातील सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात रासायनिक धुरीकरण केले जाणार आहे. यासाठी सहा गट तयार करण्यात आले असून, प्रत्येक गटातील आरोग्य केंद्रांच्या परिसरात नियोजित दिवशी मोहीम राबविण्यात येणार आहे.

महापालिकेकडून डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नियमित साप्ताहिक वेळापत्रकानुसार कीटकनाशक फवारणी आणि रासायनिक धुरीकरण केले जाते, मात्र डासांचा प्रादुर्भाव प्रभावीपणे नियंत्रित करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. याअंतर्गत एका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात एकाच दिवशी धुरीकरण करण्यात येणार आहे.
या मोहिमेसाठी महापालिकेने नियोजन केले असून, संबंधित भागांमध्ये धुरीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. धुरीकरणाबाबत काही तक्रारी किंवा अडचणी असल्यास जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन महापौर सुजाता सुरज पाटील आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.


वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
- १६ नोव्हेंबर : सीबीडी, वाशीगाव, इंदिरानगर, राबाडा.
- १७ नोव्हेंबर : सेक्टर ४८, कुकशेत, सानपाडा, खैरणे, दिघा.
- १८ नोव्हेंबर : करावे, नेरूळ-२, तुर्भे, महापे, ऐरोली.
- १९ नोव्हेंबर : शिरवणे, जुहूगाव, कातकरीपाडा, चिंचपाडा.
- २० नोव्हेंबर : नेरूळ-१, पावणे, घणसोली, इलठणपाडा.
- २१ नोव्हेंबर : नोसिल नाका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.