तालुका स्तरावर आरोग्य प्रयोगशाळा उभारणार!

तालुका स्तरावर आरोग्य प्रयोगशाळा उभारणार!
Published on: 

तालुका स्तरावर आरोग्य प्रयोगशाळा उभारणार!
महा लॅबवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील वैद्यकीय तपासण्यांची क्षमता वाढविण्यासाठी सुमारे ३५० तालुक्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा विकसित करण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे.
तालुका स्तरावर ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिटच्या माध्यमातून या प्रयोगशाळा उभारण्याचे नियोजन असून, जिल्हा रुग्णालयांच्या ठिकाणीही एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा (इंटिग्रेटेड पब्लिक हेल्थ लॅबोरेटरी) विकसित करण्यात येणार आहेत. या माध्यमातून महा लॅब आणि अन्य बाह्य संस्थांवरील अवलंबित्व कमी करून सरकारी आरोग्य यंत्रणेची स्वतःची तपासणी क्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे मुंबईचे आरोग्यसेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी ‘सकाळ’ला सांगितले.
सध्या सरकारी रुग्णालये आणि आरोग्य संस्थांमध्ये विविध नियमित वैद्यकीय चाचण्या केल्या जातात, मात्र काही अतिरिक्त आणि विशेष तपासण्यांसाठी बाह्य प्रयोगशाळांची मदत घ्यावी लागते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाकडे उपलब्ध असलेले तंत्रज्ञ, मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री यांचा अधिक प्रभावी वापर करून शक्य तितक्या चाचण्या सरकारी यंत्रणेमार्फतच करण्याचे नियोजन आहे. राज्यात सुमारे ३५० ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट्सच्या माध्यमातून तालुका स्तरावर प्रयोगशाळा सुविधा विकसित करण्याचा विचार आहे. त्यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त तंत्रज्ञांची नियुक्ती आणि सध्याच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यावरही भर दिला जाणार आहे. याशिवाय जिल्हा रुग्णालयांच्या स्तरावर सुमारे १५ ते १६ एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा विकसित करण्याचे नियोजन आहे. ज्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालये किंवा सक्षम प्रयोगशाळा सुविधा उपलब्ध नाहीत, तेथे टप्प्याटप्प्याने या सुविधा उभारण्यात येणार आहेत. जिथे सरकारी यंत्रणेची क्षमता अपुरी पडेल, तिथे कार्यक्षम बाह्य संस्थांची मदत घेण्याचाही पर्याय खुला ठेवण्यात येणार आहे.
...
तालुका आणि जिल्हा स्तरावर प्रयोगशाळांचे जाळे विस्तारल्यास रुग्णांना स्थानिक पातळीवरच अधिकाधिक वैद्यकीय तपासण्या उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच बाह्य संस्थांवरील अवलंबित्व कमी होऊन सरकारी आरोग्य संस्थांची स्वयंपूर्णता वाढण्याची अपेक्षा आहे.
- डॉ. नितीन अंबाडेकर, आरोग्यसेवा संचालक, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.