

विक्रांत पाटील यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती
पनवेल, ता. १७ (बातमीदार) : भारतीय जनता पक्षप्रणीत राष्ट्रीय एकजूट कामगार संघटनेच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी आमदार विक्रांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे त्यांच्या समर्थकांसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे कामगारांच्या प्रश्नांना अधिक प्रभावी व्यासपीठ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय एकजूट कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न, न्याय्य मागण्या आणि हक्कांसाठी संघटितपणे लढा उभारण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आमदार पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सध्याच्या काळात कामगारांना खंबीर आणि विश्वासार्ह नेतृत्वाची गरज असून, त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या हिताचे संरक्षण करणे ही संघटनेची प्राथमिकता असली पाहिजे, असे नियुक्तिपत्रात नमूद करण्यात आले आहे.
आमदार प्रवीण दटके यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या या संघटनेची व्याप्ती वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सदैव तत्पर राहणे, संघटनेच्या ध्येयधोरणांनुसार कार्य करणे आणि कामगार कल्याणासाठी कटिबद्ध राहणे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्याने कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटनेला नवे बळ मिळेल, तसेच संघटनात्मक विस्तारालाही गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.