

भिवंडी, ता. १७ (वार्ताहर) : दुष्काळामुळे राज्यात पाणीटंचाईचे सावट पसरले असताना शहरी भागात आठवड्यातून एकदा १८ तासांसाठी पाणीकपात सुरुवात झाली आहे. त्यानुसार भिवंडी शहरात दर सोमवारी पाणी बंद असतानाच बुधवारी (ता. १८) २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कार्यकारी अभियंता संदीप पटणावर यांनी दिली आहे.
भिवंडी पालिका क्षेत्रासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा जलवाहिनीवर वऱ्हाळदेवी मंदिर येथे ३०० मिमी व्यासाचा नवीन व्हॉल्व्ह बसविणे, गौतम कंम्पाउंड येथील तानसा वाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम, तानसा मुख्य जलवाहिनी गळती-दुरुस्तीचे काम, तसेच धोबीतलाव टाकीकरिता नवीन व्हॉल्व्ह बसविणे अशी अत्यावश्यक कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी (ता. १९) सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तासांकरिता पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुढील एक दिवस कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे. शहरातील मानसरोवर, खडी मशीन रोड, वऱ्हाळदेवीनगर, पद्मानगर, गायत्रीनगर, रामनगर, नवजीवन कॉलनी, बी.एन.एन. कॉलेज रोड, पटेल कंम्पाउंड गल्ली नं. १.२.३., भैयासाहेब आंबेडकर नगर, न्यू प्रकाशनगर, माधवनगर, सोमानगर, विठ्ठलनगर, गंगाराम वाडी, न्यू टावरे कंम्पाउंड, दुधबावडी, हाफिजनगर, आलमगीर विडीओ परिसर, न्यू इंस्लामाबाद, आझमीनगर, खालीकशेठ चाळ दिवानशाह, हांडी कंम्पाउंड समरुबाग, इदगाहरोड आदी भागात पाणीपुरवठा होणार नाही, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पटणावर यांनी सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.