बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
Published on: 

बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

स्मृतिदिनी शिवसैनिकांकडून प्रतिमेला पुष्पहार अर्पण

वसई, ता. १७ (बातमीदार) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना नवघर पूर्व विभाग आणि नवघर माणिकपूर शहराच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित पदाधिकारी, शिवसैनिक आणि कामगारांनी त्यांना भावपूर्ण अभिवादन केले.
बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि न्याय्य मागण्यांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या परखड विचारांनी, प्रभावी वक्तृत्वाने आणि संघटन कौशल्याने महाराष्ट्राच्या राजकारणावर वेगळी छाप उमटवली. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडत राज्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला पालघर जिल्हाप्रमुख प्रथमेश राऊत, वसई विधानसभा संघटक शशिभूषण शर्मा, शहरप्रमुख संजय गुरव, भूपेश राऊत, विभागप्रमुख गंगाप्रसाद यादव, ओंकार भोपाळगडे, उपविभागप्रमुख प्रमोद प्रभू, राजेंद्र निकम, शाखाप्रमुख वसंत जाधव, महिला उपशहर संघटक योगिता पाटील, वंदना वायंगणकर यांच्यासह महाराष्ट्र माथाडी, वाहतूक व जनरल कामगार सेनेचे पदाधिकारी, माथाडी कामगार आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी बाळासाहेबांच्या नेतृत्वशैलीचे, सामाजिक योगदानाचे आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण केले. त्यांच्या विचारांशी निष्ठा राखून संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धारही शिवसैनिकांनी व्यक्त केला. नवघर पूर्व विभाग आणि नवघर माणिकपूर शहर शिवसेनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.