सामाजिक जाणिवेचा नवा आदर्श

सामाजिक जाणिवेचा नवा आदर्श
Published on: 

मुंबई, ता. १७ : डीटीएसएस लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कल्याण येथील बाल पुनर्वसन केंद्राला भेट देऊन तेथील बालकांसोबत आनंदाचे क्षण साजरे केले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांनी बालकांना दैनंदिन वापराच्या वस्तू आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक जाणिवेचा आदर्श निर्माण केला.

डीटीएसएस लॉ कॉलेजचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. एस. कुऱ्हाडे, डॉ. रिटा बंसल, कॉलेज प्रशासन अधिकारी समीर फनाडे आणि डॉ. शैलेश पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कॉलेजचे विद्यार्थी कैलास रणदिवे, ओमकार रहाटे, पारस देढिया, अजित पाटील, मोहम्मद शेलिया, सुमेरा खान आणि संजोग पवार यांच्या नेतृत्वाखाली विधी शाखेच्या पंधराहून अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी बाल पुनर्वसन केंद्रातील बालकांशी संवाद साधत त्यांच्यासोबत वेळ घालवला. तसेच त्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करून भविष्यातील रोजगाराच्या संधींबाबत माहिती दिली. केंद्रातील बालकांचे संगोपन करणारे कर्मचारी, अधिकारी आणि संस्थाचालक यांच्याशी संवाद साधून त्यांच्या कार्याची माहिती घेतली. केंद्राच्या कामकाजादरम्यान येणाऱ्या अडचणी आणि बालकांच्या पुनर्वसनासंदर्भातील विविध प्रश्नही विद्यार्थ्यांनी जाणून घेतले.

उपक्रमातून संवेदनशीलतेची जाणीव
भेटीतून विद्यार्थ्यांना बालकांचे अधिकार, त्यांच्यासमोरील सामाजिक व कौटुंबिक अडचणी तसेच त्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी ही भेट केवळ सामाजिक उपक्रम न ठरता सामाजिक वास्तव समजून घेण्याची आणि संवेदनशीलतेची जाणीव करून देणारी ठरली.

मुंबई : लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पुनर्वसन केंद्रातील बालकांना साहित्याचे वाटप केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.