

उल्हासनगर, ता. १७ (बातमीदार) : उल्हासनगर पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयात चालक दारू पीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित चालकाचा दारू पितानाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेत शौचालयाला सील ठोकले. तसेच संबंधित चालकाला नोटीस बजावण्यात आली आहे.
रेल्वे स्थानकाबाहेरील या सार्वजनिक शौचालयाचा दररोज मोठ्या संख्येने प्रवासी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील नागरिक वापर करतात. येथे लघुशंकेसाठी दोन रुपये, तर शौचालयाच्या वापरासाठी पाच रुपये आकारले जातात. अशा महत्त्वाच्या सार्वजनिक सुविधेची स्वच्छता राखणे आणि व्यवस्थापन योग्य पद्धतीने चालविणे ही संबंधित चालकाची जबाबदारी आहे. मात्र, नागरिकांच्या वापरासाठी असलेल्या याच ठिकाणी चालक दारू पीत असल्याचा व्हिडीओ समोर आल्याने शौचालयाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सार्वजनिक शौचालयासारख्या संवेदनशील ठिकाणी असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या व्हिडीओची दखल घेत महापालिकेच्या आरोग्य विभागाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे आणि एकनाथ पवार यांनी विलंब न करता संबंधित शौचालय सील केले. तसेच चालकाला नोटीस बजावली.
अन्य शौचालयांचीही तपासणी होणार
हे शौचालय रिक्षा स्थानकासमोर आहे. जागरूक नागरिकांनी हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने कारवाई करण्यात आली. शहरातील अन्य सार्वजनिक शौचालयांचीही तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती विनोद केणे आणि एकनाथ पवार यांनी दिली. सार्वजनिक सुविधांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी नियमित देखरेख ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.