पालिकेचे सभागृह खासगी व्यक्तीकडे!

पालिकेचे सभागृह खासगी व्यक्तीकडे!
Published on: 

भिवंडी, ता. १७ (वार्ताहर) : आयुक्त अनमोल सागर यांनी प्रभाग क्र. १४ येथील सहयोग नगर आरोग्य केंद्राच्या बाजूला असलेल्या देविदास गुळवी सभागृहाची आज (ता. १७) अचानक पाहणी केली. या दरम्यान पालिकेच्या मालकीच्या गुळवी सभागृहाची चावी परिसरातील अनिलकुमार सुभाषचंद्र गुप्ता या खासगी व्यक्तीच्या ताब्यात असल्याचे आढळून आले. ही व्यक्ती बऱ्याच कालावधीपासून पालिकेच्या मालकीची मालमत्ता अनधिकृतपणे वापरत आहे. तसेच पालिकेचा महसूल बुडविल्याचे लक्षात आल्याने आयुक्तांनी सभागृहाची चावी ताब्यात घेऊन गुप्ता याच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले.

महापालिकेच्या अनेक मिळकती वापराविना पडून आहेत. काही ठिकाणी त्यांची निगा पालिका प्रशासनाकडून ठेवली जात नसल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर नुकताच पालिका आयुक्त अनमोल सागर यांनी मंगळवारी अचानक भिवंडी शहरातील सहयोग नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच भादवड येथील सोनादेवी सभागृहाला भेट दिली. पालिकेच्या मालमत्तांचे सर्वेक्षण करून सर्व मालमत्तांबाबत विभागाकडून माहिती घेण्यात येत आहे. सार्वजनिक मालमत्तांचे रक्षण करणे, ही पालिकेची जबाबदारी आहे. पालिकेची मालमत्ता कोणत्याही खासगी व्यक्तीस बेकायदा वापर करता येणार नाही. या मालमत्तेचा उपयोग शहरातील सामान्य नागरिकांसाठीच होणे आवश्यक आहे. तसेच या अनधिकृत वापरामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. या गंभीर बाबीची दाखल पालिका प्रशासन कठोर घेईल, असा इशारा आयुक्त सागर यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.