

रोहित पवारांच्या मुख्यमंत्र्यांवरील आरोपांत तथ्य नाही : आठवले
अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी; घातपात असल्यास संबंधितांची नावे समोर यावीत
पालघर, ता. १७ (बातमीदार) : आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांत तथ्य नाही, मात्र अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी झालीच पाहिजे. या अपघातामागे घातपात असल्यास त्याचीही चौकशी करून संबंधितांची नावे समोर आली पाहिजेत, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
आठवले १७ नोव्हेंबर रोजी पालघर दौऱ्यावर आले होते. त्या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘अजित पवार यांच्या अपघातामागे कोणाचा कट होता, असे म्हणता येणार नाही, मात्र हा अपघात नेमका कसा झाला, याची चौकशी झाली पाहिजे. याप्रकरणी अद्याप एफआयआर दाखल झालेला नाही, असे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर चौकशी करावी. घातपाताचा प्रकार असल्यास त्यामागे कोण आहे, हेही स्पष्ट झाले पाहिजे.’’
--------------------------
ज्ञानेशकुमार यांनी राजीनामा देऊ नये
निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेशकुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी विरोधकांची मागणी आहे, मात्र ज्ञानेशकुमार यांनी राजीनामा देऊ नये, अशी आमच्या पक्षाची भूमिका असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. संविधानाने निवडणूक आयोगाला स्वतंत्र अधिकार दिले आहेत. १३ कोटी मतदारांची नावे वगळण्यात आली असतील, तर ती कोणत्या कारणाने वगळली, याचा अभ्यास झाला पाहिजे. निवडणूक आयोगाची मतदार यादी परिपूर्ण असली पाहिजे, अशी अपेक्षा राहुल गांधी यांनी व्यक्त करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, असेही आठवले म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.