घर तोडल्याप्रकरणी चौकशीसाठी त्रिसदस्य समिती

घर तोडल्याप्रकरणी चौकशीसाठी त्रिसदस्य समिती
Published on: 

मुरबाड, ता. १८ (बातमीदार) : तालुक्यातील शाई येथील शेतकरी अनंता भोईर यांचे घर वनविभागाने तोडल्याप्रकरणी त्रिसदस्य समिती नेमून चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १५ दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर भोईर यांनी मंगळवारी (ता. १७) मुरबाड तहसीलदार कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण मागे घेतले. दरम्यान, प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.
या चौकशी समितीच्या अध्यक्षपदी सहाय्यक वनसंरक्षक सोनल वळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वनक्षेत्रपाल मुकेश सनस हे समितीचे सचिव, तर वनक्षेत्रपाल विशाल गोधडे हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. समितीने येत्या १५ दिवसांत प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करायचा आहे. शाई येथील शेतकरी अनंता भोईर यांच्या जमिनीवरील घर वनविभागाने तोडल्याने त्यांनी ५ नोव्हेंबरपासून मुरबाड तहसीलदार कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले होते. घर तोडण्याच्या कारवाईला आक्षेप घेत त्यांनी न्याय मिळण्याची मागणी केली होती. मात्र, १३ दिवस उलटूनही तोडगा निघत नसल्याने मंगळवारी जनआंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर तहसीलदार अभिजित देशमुख यांच्या दालनात वनविभाग, महसूल विभागाचे अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक झाली. चर्चेअंती प्रकरणाची त्रिसदस्य समितीमार्फत चौकशी करून १५ दिवसांत अहवाल देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर भोईर यांनी उपोषण मागे घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.