काजू, आंबा उत्पादकांना विम्याची संधी

काजू, आंबा उत्पादकांना विम्याची संधी
Published on: 

काजू, आंबा उत्पादकांना विम्याची संधी
मुरुड, ता. १८ (बातमीदार) : नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामानामुळे फळपिकांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना २०२६-२७ राबविण्यात येत आहे. या योजनेत मुरूड तालुक्यातील पात्र काजू व आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
योजनेअंतर्गत काजू पिकासाठी ११ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी हा विमा कालावधी असून, प्रतिहेक्टरी विमा संरक्षित रक्कम एक लाख २० हजार रुपये आणि शेतकरी हिस्सा चार हजार ८०० रुपये आहे. आंबा पिकासाठी १ डिसेंबर ते ३१ मे हा कालावधी असून, विमा संरक्षित रक्कम एक लाख ७० हजार रुपये आणि शेतकरी हिस्सा आठ हजार ५०० रुपये आहे.

अर्जासाठी ३० नोव्हेंबर अंतिम मुदत
विमा अर्जासाठी ३० नोव्हेंबर २०२६ ही अंतिम तारीख आहे. अर्जासोबत सातबारा उतारा, आधारकार्ड, फार्मर आयडी, जिओ टॅगिंग केलेला छायाचित्र पुरावा, स्वयंघोषणापत्र आणि बँक खात्याचे तपशील आवश्यक आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या संकेतस्थळावर किंवा महा-ई-सेवा केंद्रामार्फत अर्ज करता येईल. पात्र शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज करून फळबागांना विमा संरक्षण द्यावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.