

मुंबई, ता. १८ : महापालिका रुग्णालयांमध्ये रुग्णांना आवश्यक औषधे आणि वैद्यकीय साहित्य वेळेवर उपलब्ध व्हावे, यासाठी सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी पुढाकार घेतला आहे. महापालिका मुख्यालयातील सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्षांच्या कार्यालयात ‘व्हॉट्सॲप कार्यालय’ आणि ‘औषध हक्क नियंत्रण कक्ष’ सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. यासंदर्भात महापालिका सभागृहात ठरावाची सूचना सादर करण्यात आली आहे.
महापालिका रुग्णालयांमध्ये औषधे उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना बाहेरून महागड्या दराने औषधे खरेदी करावी लागतात. ही समस्या दूर करण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. या कक्षाच्या माध्यमातून रुग्णालयांमधील औषधांचा साठा, औषधांची उपलब्धता आणि वैद्यकीय साहित्याच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवता येणार आहे. तसेच औषधे उपलब्ध नसल्याबाबत रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांनी व्हॉट्सॲपद्वारे तक्रार केल्यास तिचे तातडीने निराकरण करण्याची यंत्रणा उभारण्याचा उद्देश आहे. या उपक्रमाची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती भांदिर्गे यांनी दिली.
या उपक्रमाची लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल. महापालिका रुग्णालयांमध्ये रुग्णांना औषधे आणि वैद्यकीय साहित्य सहज उपलब्ध व्हावे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि आरोग्यसेवांमधील पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढावे, यासाठी आपण कटिबद्ध असल्याची माहिती आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.