

सिद्धी करवलेच्या विकासाला गती
सहा कोटी ९९ लाखांच्या कामांचे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन
पनवेल, ता. १८ (बातमीदार) : पनवेल महापालिका क्षेत्रातील सिद्धी करवले गावाच्या विकासाला आता मोठे बळ मिळणार आहे. गावातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी तब्बल सहा कोटी ९९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा बुधवारी महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. त्यामुळे गावातील पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धी करवले गावातील विकासकामांना गती देण्यात आली आहे. मंजूर निधीतून गावातील मूलभूत पायाभूत सुविधांचा विकास आणि आवश्यक नागरी सोयी-सुविधांचे उन्नतीकरण करण्यात येणार आहे. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर गावातील सुविधा अधिक सक्षम करण्याची गरज असून, या कामांमुळे नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
या भूमिपूजन सोहळ्याला महापालिकेचे नगरसेवक नितेश पाटील, नगरसेविका विजयश्री पाटील, संतोष बुवा पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
चौकट
पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा
गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या निधीतून प्रस्तावित कामे पूर्ण झाल्यानंतर गावातील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊन नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासप्रयत्नांना या निधीमुळे अधिक बळ मिळणार असून, सिद्धी करवलेच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.