मुंब्रा-कौसातील विद्यार्थ्यांसाठी महापालिका उभारणार नवी शाळा

मुंब्रा-कौसातील विद्यार्थ्यांसाठी 
महापालिका उभारणार नवी शाळा
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : मुंब्रा-कौसा परिसरातील विद्यार्थ्यांची शाळांसाठी होणारी पायपीट थांबविण्यासाठी ठाणे महापालिकेने नवीन शाळा उभारण्याची तयारी केली आहे. कौसा येथील घासवाला कम्पाउंड परिसरातील महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर ही शाळा बांधण्यात येणार आहे. दर्गा रोड ते शिमला पार्क परिसरातील सुमारे एक हजार ते बाराशे विद्यार्थ्यांना या शाळेचा लाभ मिळणार आहे. या बांधकामासाठी एक कोटी ३० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भातील प्रस्ताव महासभेच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

मुंब्रा प्रभाग क्रमांक ३२ मधील सर्व्हे क्रमांक १४६ येथे महापालिकेचा मोकळा भूखंड आहे. या परिसरात लोकवस्ती आणि विद्यार्थ्यांची संख्या मोठी असतानाही शाळांसाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. परिणामी, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परिसरापासून दूर जावे लागते. ही गरज लक्षात घेऊन या ठिकाणी महापालिकेची शाळा उभारण्याची मागणी विरोधी पक्षनेते अशरफ ऊर्फ शानू पठाण यांनी केली होती. त्यांच्या मागणीनंतर महापालिकेच्या शिक्षण विभागानेही नवीन शाळा बांधण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला. विशेष म्हणजे, प्रस्तावित जागा सध्या खेळाच्या मैदानासाठी आरक्षित आहे, मात्र विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन या भूखंडावर तात्पुरत्या स्वरूपात शाळा उभारण्यास महापालिकेच्या शहर विकास विभागाने सहमती दर्शविली आहे. त्यामुळे घासवाला कम्पाउंड परिसरात शाळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

४० लाखांचा निधी; उर्वरित भार महापालिकेवर
या शाळेच्या बांधकामासाठी ४० लाख रुपये प्रभाग सुधारणा निधीतून उपलब्ध करून दिले आहेत. उर्वरित ९० लाखांचा खर्च महापालिकेला करावा लागणार आहे, मात्र अर्थसंकल्पात या कामासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद नसल्याने अतिरिक्त खर्चाला सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.