

ठाणे, ता. १८ : कोणतीही शासकीय परवानगी न घेता माती आणि मुरूमाचा अनधिकृत भराव केल्याप्रकरणी तसेच सरकारने ठोठावलेला आठ कोटी ३० लाखांचा दंड थकविल्याप्रकरणी साई प्रोजेक्ट प्रा. लि.चे विकसक शाहुपुरजी पालोजी यांच्याविरोधात सानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे तहसील कार्यालयाने दिली. जुईनगर रेल्वे स्थानक परिसरात तब्बल सात हजार ९४९ ब्रास गौणखनिजाचा अनधिकृत वापर झाल्याचे महसूल विभागाच्या तपासात समोर आले आहे. दंडवसुलीसाठी महसूल विभागाने यापूर्वीच प्रकल्पातील सॅम्पल फ्लॅट जप्त करून सील केला होता.
मौजे सोनखार येथील जुईनगर रेल्वे स्थानकाच्या उत्तरेकडील रेल्वे पटरीलगत साई प्रोजेक्टच्या प्लॉट क्रमांक १८८ ए, सेक्टर १० आणि प्लॉट क्रमांक ९ एम, सेक्टर ११ येथील फोरकोर्ट परिसरात नोव्हेंबर २०१८ मध्ये अनधिकृत भराव झाल्याचे उघडकीस आले होते. कोणतीही शासकीय परवानगी न घेता ब्रास माती आणि मुरूमाचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणी ठाणे तहसीलदार कार्यालयाने २०१८ ते २०२३ या कालावधीत संबंधित कंपनीला वारंवार नोटिसा बजावल्या. मात्र, कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर १८ जानेवारी २०२४ रोजी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी आठ कोटी ३० लाखांचा दंड आकारून तो १५ दिवसांत सरकारकडे जमा करण्याचे आदेश दिले. मात्र, दंडाची रक्कम भरण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. अनधिकृत गौणखनिज उत्खनन आणि वापराच्या प्रकरणांमध्ये ठाणे तहसीलदार कार्यालयामार्फत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, असे निवासी नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.