आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वीच बदलला होता मोबाईल

आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वीच बदलला होता मोबाईल
Published on: 

व्हॉट्सॲप हॅक प्रकरणाचा तपास महाराष्ट्र सायबरकडे
दोन दिवसांपूर्वीच बदलला मोबाईल

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : ठाणे शहराचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे व्हॉट्सॲप खाते हॅक प्रकरणाचा तपास महाराष्ट्र सायबर सेलच्या अखत्यारीत वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर हॅकिंगचा छडा लावण्यासाठी सहा जणांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. या पथकामध्ये दोन वरिष्ठ अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
ठाणे सायबर सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश वारके यांच्याकडे या पथकाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलचे पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, व्हॉट्सॲप मोठ्या प्रमाणात फाइल लोड झाल्याने आयुक्तांचा मोबाईल हँग झाला. त्यामधील काही फाइल ओपन होत नव्हत्या. त्यामुळे व्हॉट्सॲप लॉगआऊट करून अनइन्स्टॉल करण्यात आले. सध्या आयुक्तांचे व्हॉट्सॲप बंद असून, केवळ मोबाईल कॉलिंग सुरू आहे. या हॅकिंगमागे नेमके कोण आहे, खाते कशा पद्धतीने ताब्यात घेण्यात आले आणि आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करण्यामागील उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, आयुक्तांनी रविवारी (ता. १५) मोबाईल बदलल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत व्हॉट्सॲप हॅक झाल्याने मोबाईल बदलण्याचा आणि या प्रकाराचा काही संबंध आहे का, याचीही तपास यंत्रणा पडताळणी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.