

कुलगुरूंच्या शिफारसीनंतर
प्र-कुलगुरू हटविता येणार
विद्यापीठ कायद्यात नव्याने बदल करण्यास मान्यता
मुंबई, ता. १८ : राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठातील कुलगुरूंना आपल्याकडील प्र-कुलगुरूविरोधात काही अडचणी वाटल्यास त्यांना हटविण्यासाठीची शिफारस थेट कुलपतींकडे करण्याचे अधिक बहाल केले जाणार आहेत. यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत राज्य विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमात अध्यादेशाद्वारे सुधारणा केली जाणार आहे. राज्यात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम १ मार्च २०१७ पासून अंमलात आहे. या अधिनियमात विद्यापीठाशी निगडित विविध विषयांकरिता तरतूद करण्यात आली आहे; मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात झालेल्या बदलाच्या अनुषंगाने अधिनियमात करण्याची आवश्यकता होती. त्यानुसार अधिनियमातील कलम १३(१२) आणि कलम १००(५)(अ) यामध्ये सुधारणा करण्याच्या अध्यादेशाच्या मसुद्यास मान्यता देण्यात आली. कलम १३(१२) मधील सुधारणेमुळे राज्याच्या कुलपती यांना संबंधित विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या शिफारशीवरून प्र-कुलगुरू यांना हटविता येणार आहे.
यासोबत राज्यातील सर्वच सार्वजनिक विद्यापीठांमध्ये १००(५)(अ) मध्ये विद्यापीठाशी निगडित बांधकामे आणि इतर विकसनाचे कामे आणि त्यासाठीची देखरेख आता व्यवस्थापन परिषदेच्या देखरेखीखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करता येतील. यासाठी हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमात सुधारणा करणारे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.