ठाणे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा

ठाणे जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा
Published on: 

भिवंडी, ता. १९ (वार्ताहर) : ठाणे जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश करून शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौघुले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन दिले आहे.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांतील ग्रामीण भागात यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे भातशेतीसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाले असले, तरी जवळपास ५० ते ६० टक्के भाग आजही ग्रामीण आहे. अनेक गावांमधील नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे केवळ जिल्ह्याचे शहरी स्वरूप विचारात घेऊन त्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश न करणे ग्रामीण शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरू शकते, असे चौघुले यांनी निवेदनात म्हटले आहे.
पाचही तालुक्यांतील शेतीच्या नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे आणि वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करावे. भातशेतीसह अन्य पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्याबाबत विशेष निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. ज्या शेतकऱ्यांची भातशेती पूर्णपणे वाया गेल्याने त्यांनी पीक काढून टाकले आहे, अशा शेतकऱ्यांनाही मदतीपासून वंचित ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय पीकविमा, कृषी विभागाच्या विविध योजना आणि आपत्ती निवारणाच्या निकषांनुसार बाधित शेतकऱ्यांना मिळणारे सर्व लाभ तातडीने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही आमदार चौघुले यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.