

मुरबाड, ता. १९ (वार्ताहर) : भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा जागर करण्यासाठी साप्ताहिक हर्ष किरणच्या वतीने गुरुवारी (ता. २६) शहापूर येथे संविधान गौरव दिन साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
कल्पना तारमळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. चारुलता धानके उपस्थित राहणार आहेत. तसेच तहसीलदार परमेश्वर कासुळे, आमदार दौलत दरोडा, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्यासह पोलिस व महसूल विभागातील अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संविधानातील आदर्श मूल्यांचा प्रसार, सामाजिक प्रबोधन आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम २०१४ पासून सातत्याने राबविण्यात येत आहे. यंदाही २६ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर हा कार्यक्रम होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावर एकपात्री प्रयोग
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित ‘होय मी सावित्री बोलते!’ या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण. शिवमती साधना भेरे या एकपात्री प्रयोगातून सावित्रीबाईंच्या जीवनकार्याचा आणि विचारांचा जागर करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.