बुवाबाजीविरोधात मुरबाडमध्ये वैचारिक जागर

बुवाबाजीविरोधात मुरबाडमध्ये वैचारिक जागर
Published on: 

मुरबाड, ता. १९ (बातमीदार) : समाजातील अंधश्रद्धा, फलज्योतिष आणि बुवाबाजीविरोधात जनजागृती करून नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी शनिवारी (ता. २१) मुरबाड येथे संघर्ष परिषद घेण्यात येणार आहे. शहरातील कुणबी भवन येथे दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेसात या वेळेत होणाऱ्या या परिषदेचे उद्‍घाटन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते होणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने ही परिषद होणार आहे. यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विविध पैलूंवर चर्चा आणि वैचारिक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या केंद्रीय सदस्य सुशीला मुंडे, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सुषमा बसवंत आणि प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे यांची व्याख्याने होणार आहेत. संकटाच्या काळात नागरिकांनी भूलथापांना बळी न पडता विज्ञान, वैद्यकीय उपचार आणि संविधानिक मूल्यांचा आधार घ्यावा, हा परिषदेचा मुख्य उद्देश आहे. चमत्कार समजल्या जाणाऱ्या घटनांकडे अंधविश्वासाने न पाहता जिज्ञासा, निरीक्षण आणि तर्कबुद्धीच्या आधारे त्यांची चिकित्सा करण्याची वृत्ती विकसित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. मुरबाड तालुका कुणबी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष गणपत तात्या विशे आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कल्याण शाखेचे अध्यक्ष डॉ. सुरेश कापरे यांनी ही माहिती दिली. या वेळी ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लाड, तहसीलदार अभिजित देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन हुंदाळकर आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रधान सचिव आरती नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.