मैत्रीच्या वादातून अपहरण करून मारहाण

मैत्रीच्या वादातून अपहरण करून मारहाण
Published on

नवी मुंबई, ता. २८ (वार्ताहर) : मैत्रीच्या वादातून तरुणाचे अपहरण करून त्याला डांबून ठेवत बेदम मारहाण केल्याची, तसेच सुटकेसाठी त्याच्या पत्नीकडे तब्बल ११ लाखांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खारघर ते उलवेदरम्यान घडलेल्या या थरारक अपहरण प्रकरणात कोपरखैरणे पोलिसांनी लाइव्ह लोकेशनद्वारे शोध घेऊन अपहृत तरुणाची सुटका करून सहा संशयितांना अटक केली. या गुह्यात वापरलेल्या दोन आलिशान गाड्याही जप्त केल्या आहेत. पोलिसांनी फरार एका तरुणीसह तिघांचा शोध सुरू केला आहे.

कामोठे येथील जाकीर शेख (वय २२) याला २३ ऑगस्ट रोजी रात्री परिचयातील ऋतुजा नावाच्या तरुणीने त्याला फोन करून आईने घराबाहेर काढल्याचे सांगितले. तसेच त्याला घेण्यासाठी खारघर स्थानकावर बोलावून घेतले. जाकीर दुचाकीवरून खारघर येथे पोहोचताच ऋतुजाचा भाऊ रोहित हिनुकले, यश मढवी व त्यांच्या साथीदारांनी कारने त्याचा पाठलाग केला. त्यानंतर जबरदस्तीने जाकीर याला गाडीत कोंबून त्याला कोपरखैरणे सेक्टर चार येथील प्राजक्ता सोसायटीच्या तळमजल्यावर नेले. तेथे त्यांनी जाकीरला ऋतुजासोबत का बोलतोस, असा जाब विचारत त्याला शिवीगाळ करून मारहाण केली.

कारमधून उलवे परिसरात फिरवले
जाकीर याला गाडीमध्ये डांबून उलवे सेक्टर-१९ ए येथील भूमीपार्क इमारतीतील एका फ्लॅटमध्ये नेले. तेथे काही व्यक्तींनी जाकीरला बेदम मारहाण केली. तसेच पैसे न दिल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत त्याला गाडीमधून उलवे परिसरात फिरवले. त्यानंतर त्याच्या सुटकेसाठी पत्नीकडे ११ लाखांच्या खंडणीची मागणी केली. या वेळी जाकीरने पत्नीला मोबाईलद्वारे लाइव्ह लोकेशन पाठवले.

तिघांचा शोध सुरू
त्याच्या पत्नीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी लाइव्ह लोकेशनच्या मदतीने जाकीरचा शोध घेऊन त्याची सुटका केली. तसेच किरण हिनुकले (वय ५२), रोहित (२६), विनोदकुमार नायर (४९), श्रीहरी पिल्लई (२९), अमलराज मुवारी (२१) आणि विघ्नेश पिल्ले (३१) यांना अटक केली आहे. पोलिसांनी यश मढवी, अपेक्षा बारसागडे आणि प्रतिज्ञा अंबाडे या फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com