

अडीच कोटींच्या परकीय चलन घोटाळ्याप्रकरणी सीएविराेधात गुन्हा
नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : कोणतीही पडताळणी न करता बनावट प्रमाणपत्रे (फॉर्म १५ सीबी) जारी करून नवी मुंबईतील एका कंपनीला दोन कोटी ४६ लाख ५७ हजार रुपयांचा निधी परदेशात बेकायदा पाठविण्यास मदत केल्याप्रकरणी मुंबईतील एका चार्टर्ड अकाउंटंटविरुद्ध (सीए) एपीएमसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गैरव्यवहारामुळे देशाच्या परकीय चलनसाठ्याचे मोठे नुकसान झाल्याचा ठपका आयकर विभागाने ठेवला आहे.
एपीएमसीतील मेसर्स एस. एन. रथनाम मरिन सी फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने २०२४-२५ मध्ये दोन कोटी ४६ लाख ५७ हजार ३१० रुपयांचा निधी बेकायदा देशाबाहेर पाठवला होता. त्यामुळे आयकर विभागाच्या पुणे तपास संचालनालयामार्फत १८ ऑगस्टला एपीएमसीतील मेसर्स एस. एन. रथनाम मरीन सी फूड्स प्रा.लि. या कंपनीच्या कार्यालयावर सर्वेक्षण करण्यात आले. या तपासणीदरम्यान कंपनीने संशयास्पद व फसव्या पद्धतीने परदेशात मोठ्या प्रमाणावर निधी पाठविल्याचे उघड झाले. सीए अमित प्रभू यांनी संबंधित सी-फूड कंपनीची कोणतीही लेखापुस्तके अथवा करारपत्रांची प्रत्यक्ष तपासणी न करताच, आर्थिक फायद्यासाठी आपल्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे आयकर विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाले. याप्रकरणी आयकर विभागाचे सहाय्यक संचालक (अन्वेषण) राजेप्रताप वाहाणे यांनी एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी सीए अमित अप्पू प्रभू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.