

पेपरफुटीची घटना पदभार स्वीकारण्यापूर्वीची
एमपीएससीचे अध्यक्ष भीमनवार यांचे रोहित पवार यांना प्रत्युत्तर
नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर): राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करीत सीबीडी बेलापूर येथील आयोगाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते. याबाबत भीमनवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. औषध निरीक्षक परीक्षेशी संबंधित कथित प्रश्नपत्रिका फुटीची घटना आपण अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वीची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच कोणत्याही गंभीर आरोपांचे मूल्यांकन अधिकृत नोंदी आणि पुराव्यांच्या आधारे व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
औषध निरीक्षक परीक्षेशी संबंधित प्रश्नपत्रिका फुटीची घटना जानेवारी २०२६ मध्ये निदर्शनास आली. आपण १८ फेब्रुवारी २०२६ मध्ये एमपीएससीच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली आणि ३ मार्च २०२६ मध्ये प्रत्यक्ष पदभार स्वीकारला. या प्रकरणाची आयोगाने गंभीर दखल घेत तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे भीमनवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आयोगाने अंतर्गत उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून, परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणा सुचविण्यासाठी शासनानेही स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी एमपीएससीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नोत्तरांबाबतच्या शंकांचे पारदर्शक निरसन करण्याची आणि कथित पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांनी अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.