पोलिस निरीक्षकांच्या नियुक्तीत फेरबदल

पोलिस निरीक्षकांच्या नियुक्तीत फेरबदल
Published on

नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील, तसेच राज्यभरातील इतर विविध घटकांतून बदली होऊन नव्याने हजर झालेल्या पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्यांचे आदेश आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ३१ ऑगस्ट रोजी काढले आहेत. या आदेशानुसार नव्याने हजर झालेल्या पोलिस निरीक्षकांवर व आयुक्तालयात आधीपासून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवर विविध पोलिस ठाणी, गुन्हे शाखा, वाहतूक विभाग आणि विशेष शाखांमध्ये जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नवी मुंबई पोलिस दलात इतर घटकांतून आठ पोलिस निरीक्षक दाखल झाले आहेत. पोलिस निरीक्षक दीपक शिखरे (मुंबई शहर) यांना उलवे ठाण्यात, निरीक्षक रेवणसिध्द ठेंगले (मुंबई शहर) यांना सीवूड वाहतूक शाखेत, पोलिस निरीक्षक महेशकुमार सरतापे (पीएमआरडीए, पुणे) यांना पनवेल शहर वाहतूक शाखेत, महिला पोलिस निरीक्षक अश्विनी कुसूरकर (महाराष्ट्र सायबर) यांना बीडीडीएस, पोलिस निरीक्षक सुरेश हरके (अमरावती ग्रामीण) यांना गुन्हे शाखेत, निरीक्षक प्रदिप लांडे (नागपूर) यांना वाशी पोलिस ठाण्यात, निरीक्षक शत्रुघ्न माळी (पिंपरी-चिंचवड) यांना मानव संसाधन शाखेत आणि पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी (डायल-११२) यांची नवीन पनवेल वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्तांनी नवी मुंबई आयुक्तालयांतर्गत चार पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. अश्विनी पाटील (उलवे पोलिस ठाणे) यांची आरबीआय-सुरक्षा शाखेत, मोहिनी लोखंडे (वाहतूक शाखा) यांची तुर्भे पोलिस ठाण्यामध्ये, औदुंबर पाटील (वाहतूक शाखा) यांची गुन्हे शाखेत तसेच नीरज चौधरी (बीडीडीएस) यांची सुरक्षा शाखेत बदली केली आहे.

नवी मुंबई पोलिस दलात नव्याने दाखल झालेल्या तीन सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्यादेखील करण्यात आल्या आहेत. यात सहाय्यक पोलिस निरीक्षक शितल कदम (मुंबई शहर) यांची कामोठे पोलिस ठाण्यात, सहाय्यक पोलिस निरीक्षक पूनम पाटील (सांगली) यांची पनवेल शहर पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे, तर उपनिरीक्षक सुभाष कोंकणे (तुर्भे वाहतूक शाखा) यांची वाहतूक विभागाचे पोलिस उप आयुक्त यांच्या कार्यालयात बदली केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com