नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ धावत्या कॅबमध्ये तरुणीवर चालकाचा अत्याचाराचा प्रयत्न; पीडितेच्या धाडसामुळे टळला मोठा अनर्थ; अवघ्या काही तासांत आरोपी चालक पोलिसांच्या जाळ्यात.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ धावत्या कॅबमध्ये तरुणीवर चालकाचा अत्याचाराचा प्रयत्न;  पीडितेच्या धाडसामुळे टळला मोठा अनर्थ; अवघ्या काही तासांत आरोपी चालक पोलिसांच्या जाळ्यात.
Published on

कॅबमध्ये तरुणीवर चालकाचा अत्याचाराचा प्रयत्न

नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : चेंबूर येथून २३ वर्षीय तरुणी मध्यरात्री पनवेल येथे प्रवास करीत असताना तिने केलेल्या कॅबच्या चालकानेच तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. ६) रात्री घडली. दरम्यान, तरुणीने प्रतिकार करीत आरडाओरड केल्याने कॅबचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेनंतर पोलिसांनी काही तासांतच कॅबचालकाचा शोध घेत त्याला अटक केली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. २३ वर्षीय पीडित तरुणी पनवेल येथे राहण्यास असून, ती रविवारी रात्री मित्रांसोबत चेंबूरला पार्टीसाठी गेली होती. रात्री उशिरा घरी परतण्यासाठी ओला कॅब बुक केली. त्यानुसार कॅबचालक मोहम्मद अफजल शेख हा पनवेल येथे तरुणीला तिच्या घरी सोडण्यासाठी चेंबूरहून निघाला. मध्यरात्री कॅब नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील उलवे ते चिंचपाड्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर पोहोचली. त्यानंतर पाणी पिण्याच्या बहाण्याने चालक काही वेळासाठी कॅबमधून खाली उतरला. नंतर त्याने कॅबमध्ये मागील सीटवर बसून तरुणीशी गैरवर्तन केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने धाडसाने चालकाचा तीव्र प्रतिकार केला. जोरजोरात आरडाओरड करीत स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर तिने कॅबच्या बाहेर पडून मदतीसाठी आरडाओरड केली. तरुणीचा तीव्र प्रतिकार आणि आरडाओरड पाहून घाबरलेला कॅबचालक घटनास्थळावरून पसार झाला.
या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने आपल्या कुटुंबीयांना फोन करून या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर तरुणीने नवी मुंबई विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. विमानतळ पोलिसांनी आरोपी कॅबचालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली.

महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न या गंभीर घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी विमानतळ परिसरातील निर्मनुष्य रस्त्यांवर महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाने अधिक प्रभावी गस्त आणि कठोर सुरक्षा उपाययोजना राबवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com