एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱयाने लाटले 12 लाखांचे मनुके; सोलापूरच्या शेतकऱयाची फसवणूक, व्यापाऱयावर गुन्हा दाखल

एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱयाने लाटले 12 लाखांचे मनुके;   सोलापूरच्या शेतकऱयाची फसवणूक, व्यापाऱयावर गुन्हा दाखल
Published on

एपीएमसी मार्केटमधील व्यापाऱ्याने लाटले १२ लाखांचे मनुके
सोलापूरच्या शेतकऱ्याची फसवणूक; व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल
नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : मनुक्याला चांगला भाव देण्याचे प्रलोभन दाखवून वाशी येथील एपीएमसी मार्केटमधील एका व्यापाऱ्याने सोलापूरच्या शेतकऱ्याची तब्बल १२ लाख ५६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बिपीन मकवाना असे या व्यापाऱ्याचे नाव असून, एपीएमसी पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाधान आसबे हे मूळचे सोलापूर जिह्यातील असून, सध्या ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात मुंबई विमानतळ येथे हेडकॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. नोकरी सांभाळून ते आपल्या तीन एकर जागेवर द्राक्षाचे व मनुक्याचे उत्पादन घेतात. मार्चमध्ये त्यांची ओळख एपीएमसी मार्केटमधील मे. जिया इम्पेक्स ड्रायफ्रूट्सचे मालक बिपीन मकवाना यांच्याशी झाली होती. बिपीन यांनी मनुक्याला चांगला भाव देण्याची हमी दिल्याने समाधान यांनी आपल्या व इतर नातेवाइकांच्या शेतातील मनुके विक्रीसाठी देण्याचे ठरवले. यानुसार मार्च महिन्यात आसबे यांनी वेगवेगळ्या टप्प्यात एकूण १२ लाख ५६ हजार रुपये किमतीचे २४७ बॉक्स (अंदाजे ३७०० किलो वजन) मनुके मकवाना याच्या ताब्यात दिले होते.

पैसे देण्यास टाळाटाळ, जीवे मारण्याची धमकी
बिपीन मकवाना याने पहिल्या व्यवहारात एक लाख ६० हजार रुपये देऊन आसबे यांचा विश्वास संपादन केला. उर्वरित रकमेबाबत विचारणा केल्यानंतर मकवाना यांनी आसबे यांच्याकडून बँकेचा तपशील घेऊन खात्यात चार लाख रुपये जमा केल्याची बनावट पावती व्हॉट्सॲपवर पाठवली. बँकेत जाऊन तपासणी केली असता कोणतीही रक्कम जमा झाली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आसबे यांनी पैशांसाठी तगादा लावल्यानंतर आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली व दुकानाचे शटर बंद करून टाळटाळ केली. तसेच पैसे देणार नसल्याचे बजावून जीवे मारण्याची धमकी दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आसबे यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com