

गणेशोत्सवात पनवेल वाहतूक पोलिस ॲक्शन मोडमध्ये
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सात ठिकाणी पार्किंगची सुविधा; काही मार्गांवर वाहतूक बंद, एकेरी मार्गाचीही अंमलबजावणी
पनवेल, ता. ११ (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील वाढती गर्दी आणि संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पनवेल शहर वाहतूक शाखेने विशेष वाहतूक व्यवस्था लागू केली आहे. गणेशभक्त आणि नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी शहरात सात प्रमुख ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार एकेरी वाहतूक, सम-विषम पार्किंग आणि बॅरिकेडिंग करण्यात येणार आहे.
येथे असेल पार्किंगची सोय (सात ठिकाणे) :
१. फडके नाट्यगृहासमोर : मराठी शाळेच्या प्रांगणात दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग
२. नवीन तहसील कार्यालय : तहसील इमारतीमध्ये केवळ दुचाकींसाठी पार्किंग व्यवस्था
३. टपाल नाका : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या मागील बाजूस चारचाकी, तर समोरील बाजूस दुचाकी पार्किंग
४. कर्नाळा सर्कल परिसर : वाखरीसमोरील नवीन कन्स्ट्रक्शनची जागा व महापालिका शॉपसमोरील जागा दुचाकींसाठी उपलब्ध
५. लाईन आळी रोड : पादुका फुटवेअर दुकानाशेजारील विलास कोठारी यांच्या जागेत दुचाकी व चारचाकी वाहनांची सोय
६. डॉ. आंबेडकर पुतळा परिसर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील बाजूस वाहनांसाठी जागा
७. गुणे हॉस्पिटल व डी.एड. कॉलेज : कॉलेज व हॉस्पिटलसमोरील मोकळ्या जागेत दुचाकी व चारचाकी पार्किंग
वाहतुकीत बदल व प्रवेशबंदी मार्ग :
उरण नाका ते टपाल नाका : या मार्गावर रिक्षा आणि चारचाकी वाहनांना पूर्णपणे प्रवेशबंदी असेल. या वाहनांना उरण नाका-पंचरत्न सर्कलमार्गे इच्छित स्थळी जावे लागेल.
फुल मार्केट ते पोलिस चौकी व पटेल हॉस्पिटल मार्ग : गणेशोत्सवाच्या काळात हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील.
कर्नाळा फुल मार्केट ते कर्मवीर भाऊराव चौक : हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असून, या ठिकाणी तात्पुरत्या बाजाराची व्यवस्था केली जाईल.
माल वाहतुकीची वेळ निश्चित : उरण नाका ते टपाल नाका भागातील व्यापाऱ्यांशी चर्चा करून जड वाहनांतून मालाची चढ-उतार करण्यासाठी दुपारी १ ते ४ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे.
गणेशोत्सवातील गर्दी आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी पनवेल शहर वाहतूक शाखेकडून ७० पोलिस कर्मचारी आणि सात अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांनी रस्त्यावर कुठेही वाहने पार्क न करता प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणीच पार्किंग करावी. अनधिकृतपणे वाहने पार्क केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
- सुभाष पुजारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पनवेल शहर वाहतूक शाखा
--------------------------
पनवेलमध्ये गणेशोत्सवानिमित्त वाहतूक बदल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.