वेश्याव्यवसायासाठी मुली पुरवणाऱया महिला दलालास सानपाडा येथून अटक, ३ पीडित महिलांची सुटका

वेश्याव्यवसायासाठी मुली पुरवणाऱया महिला दलालास सानपाडा येथून अटक, ३ पीडित महिलांची सुटका
Published on

वेश्याव्यवसायासाठी मुली पुरवणाऱ्या महिला दलालास सानपाडा येथून अटक
नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सानपाडा येथील एका हॉटेलवर छापा मारून वेश्याव्यवसायासाठी मुली पुरवणाऱ्या एका महिला दलालास रंगेहाथ अटक केली आहे. शेहनाज इस्राईल शेख (वय ४२) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी तिच्या तावडीतून तीन पीडितांची यशस्वी सुटका केली आहे.
नवी मुंबई परिसरातील एक महिला वेश्याव्यवसायासाठी महिला व मुली पुरवण्याचे मोठे रॅकेट चालवत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या महिलेला पकडण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कदम यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करत सापळा रचण्यात आला. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून शेहनाजला व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला असता २० हजार रुपयांत सौदा निश्चित करुन सानपाडा रेल्वे स्थानकासमोरील शिकारा हॉलमध्ये बोलावले. त्यानुसार गुरुवारी (ता. १०) बनावट ग्राहक हॉलमध्ये पोहोचल्यानंतर शेहनाजने त्याच्याकडून २० हजार रुपये घेतले. बाहेर दबा धरून बसलेल्या पोलिसांच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकत शेहनाज आणि तिच्याभोवती असणाऱ्या तीन महिलांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी तिन्ही पीडितांची सुटका करून दलाल शेहनाजला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com