

वाशीतील व्यावसायिकाला सराफाने घातला दोन कोटी ५६ लाखांचा गंडा
नवीन दागिने बनवण्याच्या बहाण्याने मित्रानेच लांबवले वितळलेले सोने
नवी मुंबई, ता. १७ (वार्ताहर) : मुलीच्या लग्नासाठी नवीन डिझाइनचे दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने एका सराफाने वाशीतील व्यावसायिकाची दोन कोटी ५६ लाख ७३ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रवीणकुमार रावल (वय ३८) असे आरोपीचे नाव असून, वाशी पोलिसांनी त्याच्या विरोधात अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार भरत जैन हे वाशी सेक्टर-१६ मध्ये राहण्यास असून, त्यांचा हार्डवेअर सप्लाय आणि जुन्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. जैन यांच्या मुलेचे लग्न ठरल्यामुळे जुने सोन्याचे दागिने मोडून नवीन फॅशनेबल डिझाइनमध्ये बनवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला होता. त्यानुसार भरत जैन यांनी ओळखीचा प्रवीणकुमार रावल याच्याकडे हे काम सोपवले होते. १६ फेब्रुवारी रोजी जैन कुटुंबीयांनी वाशी येथील राहत्या घरी पंचांसमोर आणि कायदेशीर कागदपत्रे (नोटरी व करारनामा) तयार करुन २०५३.९००ग्रॅम (अंदाजे दोन किलो ५३ ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिने प्रवीणकुमार रावल याच्या स्वाधीन केले. १६ मेपर्यंत हे दागिने तयार करून देणे आवश्यक होते, मात्र प्रवीणकुमार रावल याने टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर जैन यांनी कोपरखैरणे येथील त्याच्या घरी जाऊन चौकशी केली असता त्याने ते घर विकल्याचे समजले. तसेच, मूळ गावी जाऊन विचारणा केली असता रावल याने अरेरावी करत सोन्याची परतफेड करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर भरत जैन यांनी वाशी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.