

मुंबई विभागात ‘सेवा संकल्प’ अभियानाचा श्रीगणेशा
विद्यार्थी संवादापासून ज्येष्ठ नागरिकांच्या भेटीपर्यंत विविध उपक्रम; महिनाभर जनजागृतीचा धडाका
नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मुंबई विभागात गुरुवारी (ता. १७) ‘सेवा संकल्प’ अभियानाची उत्साहात सुरुवात झाली. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या महिनाभराच्या कालावधीत चालणाऱ्या या अभियानांतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबवले जात आहे.
समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा, अनुदानित वसतिगृहे, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कार्यक्रम घेतले जात आहेत. पुढील महिनाभर ‘सेवा माझे योगदान’ या संकल्पनेतून प्रचार, प्रसिद्धी आणि जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांनी सांगितले.
रामदास आठवलेंचा विद्यार्थ्यांशी संवाद
चेंबूर येथील एक हजार मुलांच्या शासकीय वसतिगृहात केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत विद्यार्थी संवाद कार्यक्रम झाला. विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध शिष्यवृत्ती व योजनांची माहिती देत आठवले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भिवंडीतील शासकीय वसतिगृहात योजनांबाबत जनजागृती शिबिर घेण्यात आले.
विविध कार्यक्रम
पालघरमध्ये वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून योजनांच्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांचे अनुभव जाणून घेण्यात आले.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील मातोश्री वृद्धाश्रमाला भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस करण्यात आली.
रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांतही विविध कार्यक्रम घेण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.