

केबल चोरी करणाऱ्या आरोपीचा
पोलिस कोठडीत मृत्यू
नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात इलेक्ट्रिकचे काम सुरू असताना केबल चोरी झाली होती. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली होती. अटकेतील आरोपी संजय कंटू यादव (३८) याची अचानक प्रकृती बिघडल्याने (गुरुवारी ता. ८) त्याचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संजय यादव वाराणसीचा रहिवासी असून, सध्या तो उलवे येथे राहत होता. जून महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे इलेक्ट्रिक केबलच्या चोरीची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी यादव याला ४ ऑक्टोबर रोजी अटक केली होती. अटकेपूर्वी त्याची पनवेल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला ८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली होती. त्यानुसार एनआरआय सागरी पोलिस ठाण्याच्या कोठडीत यादवला ठेवण्यात आले होते. बुधवारी (ता. ७) मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पद हालचालींमुळे त्याची प्रकृती बिघडल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला तातडीने नेरूळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी यादवला उपचारादरम्यान पहाटे मृत घोषित केले. वैद्यकीय तपासणीच्या वेळी आरोग्याबाबत यादवने कोणतीही तक्रार अथवा आजाराचा पूर्व इतिहास सांगितला नसल्याचे पोलिसांनी या वेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.