

अनधिकृत बांधकामावरून सिडकोशी हुज्जत
सात जणांवर गुन्हा दाखल
नवी मुंबई, ता. २६ (वार्ताहर) : घणसोलीत अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यासाठी गेलेल्या सिडकोच्या पथकाला रहिवाशांनी विरोध करून अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. रहिवाशांनी पथकाचा मार्ग अडवून कारवाई रोखल्याने रबाळे पोलिसांनी सात जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
घणसोली सेक्टर १६ मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी सिडकोचे अतिक्रमणविरोधी पथक २३ ऑक्टोबरला दुपारी घटनास्थळी गेले होते. या पथकात सिडकोचे पदनिर्देशित अधिकारी सूर्यकांत राठोड, भूमापक विकास म्हात्रे, अतिक्रमण विभागाचे पोलिस अंमलदार आणि रबाळे पोलिस ठाण्याचे कर्मचारी सहभागी होते. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई सुरू करण्यात आली होती.
या वेळी संबंधित अनधिकृत जी प्लस वन इमारतीतील काही रहिवासी आणि इतर व्यक्तींनी एकत्र येत पथकाचा मार्ग अडवला. जागा सोडणार नसल्याचे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांशी अरेरावी केली आणि दमदाटी केल्याचा आरोप आहे. काही जणांनी इमारतीतील खोल्यांमध्ये जाऊन दरवाजे आतून बंद करून घेतले. त्यामुळे सिडकोच्या पथकाला नियोजित निष्कासनाची कारवाई करता आली नाही.
याप्रकरणी सिडकोचे भूमापक योगेश गजानन वानखेडे यांनी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आकाश उपळे, शिवम सिंग, प्रमिला पाटील, मनीषा म्हात्रे, प्रीती पाटील, प्रणिता पाटील आणि ऋणा पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.