

मटका अड्ड्यावर छापा;
चौघे पोलिसांच्या ताब्यात
नवी मुंबई, ता. २९ (वार्ताहर) : तुर्भे नाका येथे सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर तुर्भे पोलिसांनी छापा टाकून मटका रायटरसह चार जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मटका पावती पुस्तक आणि आकडेमोड केलेल्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. तुर्भे नाका येथील हनुमाननगर परिसरात मटका जुगाराचा अड्डा चालवण्यात येत असल्याची माहिती तुर्भे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणी कल्याण आणि मेन बाजार मटका जुगार सुरू असल्याचे आढळले. या कारवाईत प्रमोद पवार (वय ४६), विनय हेगडे (४८), प्रकाश चव्हाण (४७) आणि संतोष ओव्हळ (४७) यांना ताब्यात घेण्यात आले. यातील प्रमोद पवार हा मटका रायटर म्हणून काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी प्रमोद पवार याच्याकडून ८०० रुपये रोख आणि मटका पावती पुस्तकासह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे, तर प्रकाश चव्हाण याच्याकडून २०० रुपये आणि आकडेमोड केलेली चिठ्ठी, तर संतोष ओव्हळ याच्याकडून ३०० रुपये आणि मटक्याच्या आकडेमोड केलेल्या चिठ्ठ्या जप्त केल्या. याप्रकरणी तुर्भे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक वसीम शेख पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.