खांदा कॉलनीत सायंकाळी चार तास ‘नो पार्किंग’! खांदा कॉलनी सिग्नल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि आदई पुलाच्या दोन्ही बाजूंना पार्किंग बंद

खांदा कॉलनीत सायंकाळी चार तास ‘नो पार्किंग’! खांदा कॉलनी सिग्नल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि आदई पुलाच्या दोन्ही बाजूंना पार्किंग बंद
Published on: 

खांदा कॉलनीत सायंकाळी चार तास ‘नो पार्किंग’!
सिग्नल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि आदई पुलाच्या दोन्ही बाजूंना पार्किंग बंद
पनवेल, ता. १ (वार्ताहर) : खांदा कॉलनी परिसरातील वाढती कोंडी फोडण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. खांदा कॉलनी सिग्नल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच पुढे आदईकडे जाणाऱ्या पुलाच्या दोन्ही बाजूंना सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत वाहनांना पार्किंग करण्यास मनाई केली आहे. याबाबतची अधिसूचना जारी केली असून, पुढील आदेशापर्यंत ही कायम राहणार आहे.
खांदा कॉलनी परिसरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र या परिसरात वाहनांसाठी पुरेशी अधिकृत पार्किंग व्यवस्था नसल्याने अनेक वाहनचालक रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आपली वाहने उभी करतात. त्यामुळे रस्ता अरूंद होऊन या भागात कोंडीची समस्या होत आहे.
या पार्श्वभूमीवर कळंबोली वाहतूक शाखेने खांदा कॉलनी सिग्नल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच पुढे आदईकडे जाणाऱ्या पुलाच्या दोन्ही बाजूंच्या मार्गावर सायंकाळी चार तास नो पार्किंग लागू करण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाकडे सादर केला होता. त्यानुसार पोलिस उपायुक्त (वाहतूक) डॉ. राहुल खाडे यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार १ नोव्हेंबरपासून सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत संबंधित रस्त्यांवर वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे, मात्र जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने, पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, शासकीय वाहने आणि अन्य अत्यावश्यक सेवांमधील वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.या निर्णयामुळे खांदा कॉलनीतील सायंकाळची वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार का, याकडे वाहनचालकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.