नवी मुंबई विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सायकलस्वार, पादचाऱ्यांना प्रवेशबंदी! कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी ते कार्गो एअरपोर्ट प्रवेशद्वारापर्यंत निर्बंध;

नवी मुंबई विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सायकलस्वार, पादचाऱ्यांना प्रवेशबंदी! कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी ते कार्गो एअरपोर्ट प्रवेशद्वारापर्यंत निर्बंध;
Published on: 

नवी मुंबई विमानतळ रस्त्यावर सायकलस्वार, पादचाऱ्यांना प्रवेशबंदी!
कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी ते कार्गो एअरपोर्ट प्रवेशद्वारापर्यंत निर्बंध
नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारा कळंबोली ते विमानतळ हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून, या मार्गावर वाहनांचा वेग अधिक असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अपघातांची शक्यता लक्षात घेता कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी ते कार्गो एअरपोर्ट प्रवेशद्वारापर्यंतच्या रस्त्यावर सायकलस्वार आणि पादचाऱ्यांना प्रवेशबंदी केली आहे. नवी मुंबई वाहतूक विभागाने याबाबतची अधिसूचना जाहीर केली असून, आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाच्या पूर्वेकडील जोडणीसाठी विकसित केलेल्या कनेक्टिव्हिटी प्रकल्पाचे उद्‍घाटन २६ ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. कळंबोली वाहतूक शाखेने या मार्गावरील वाहतुकीचा आढावा घेऊन सायकलस्वार आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रवेशबंदीची शिफारस केली होती. या मार्गावरून वेगाने वाहने धावत असल्याने सायकलस्वार किंवा पादचारी आल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच विमानतळाच्या सुरक्षेला आणि वाहतुकीलाही अडथळा निर्माण होऊ शकतो, असे वाहतूक शाखेने आपल्या अहवालात नमूद केले होते. त्यानुसार वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी ते कार्गो एअरपोर्ट प्रवेशद्वारापर्यंतच्या रस्त्यावर सायकलस्वार आणि पादचाऱ्यांना प्रवेशबंदी करण्यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या प्रवेशबंदीमधून पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका तसेच शासकीय आणि इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित सायकलस्वार व पादचाऱ्यांना वगळण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.