उलवेत प्रेयसीची गळा आवळून हत्या हत्या केल्यानंतर प्रियकराची गळफास घेऊन आत्महत्या! हत्येमागील कारण अस्पष्ट

उलवेत प्रेयसीची गळा आवळून हत्या हत्या केल्यानंतर प्रियकराची गळफास घेऊन आत्महत्या! हत्येमागील कारण अस्पष्ट
Published on: 

प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या?
उलवेतील लॉजमध्ये दोघांचे मृतदेह आढळले

नवी मुंबई, ता. १३ (वार्ताहर) : प्रियकराला भेटण्यासाठी लॉजमध्ये गेलेल्या तरुणीची गळा आवळून हत्या केल्यानंतर प्रियकराने त्याच खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उलवे येथे उघडकीस आली. उलवे सेक्टर-९ मधील एका लॉजमध्ये बुधवारी (ता. ११) रात्री हा प्रकार घडला.
अक्षिता सत्यवीर चौधरी (वय २३) आणि भारत पंकज भारद्वाज ऊर्फ गौरव (वय २४) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचे समोर आले असून, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अक्षिता कॅनडामधील एका रुग्णालयात काम करत होती. दिवाळीनिमित्त ती दोन महिन्यांपूर्वी आई-वडिलांकडे आली होती. गुरुवारी (ता. १२) ती पुन्हा कॅनडाला जाणार होती. दरम्यान, भारत तिला भेटण्यासाठी उत्तर प्रदेशातून उलवे येथे आला होता. तो अक्षिताच्या घराजवळील एका लॉजमध्ये थांबला होता.
अक्षिता भारतला भेटण्यासाठी लॉजमध्ये गेली होती, मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. संपर्क न झाल्याने तिच्या आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या मोबाईलच्या लोकेशनच्या आधारे शोध सुरू केला. चौकशीदरम्यान अक्षिता एका तरुणासोबत लॉजमध्ये आल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. संबंधित खोलीतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांनी दरवाजा उघडून पाहणी केली. त्या वेळी अक्षिता मृतावस्थेत पडलेली, तर भारत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, भारत याने अक्षिताची गळा आवळून हत्या केल्यानंतर खोलीतील पंख्याला गळफास घेतल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी सिंदूर, बांगड्या आणि अन्य साहित्य आढळल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. अक्षिताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून उलवे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.