

जीपवर आमदाराचा बनावट लोगो
पोलिसांची दिशाभूल करणारा चालक पोलिसांच्या ताब्यात
नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : पोलिसांनी आपली गाडी अडवू नये, यासाठी एका व्यक्तीने आपल्या जीपवर महाराष्ट्र विधानसभा आमदार असल्याचा बनावट लोगो आणि राजमुद्रा लावल्याचा प्रकार शिरवणे एमआयडीसी परिसरात उघडकीस आला आहे. तुर्भे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चालक इंदरप्रीत ढिल्लोन (वय ४०) याला ताब्यात घेऊन त्याची जीप जप्त केली आहे.
शुक्रवारी (ता. १३) मध्यरात्री तुर्भे पोलिस ठाण्याचे बिट मार्शल शिरवणे एमआयडीसी परिसरात गस्त घालत असताना त्यांना सेवा रस्त्यावर एक गाडी संशयास्पदरीत्या उभी असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी गाडीची पाहणी केली असता, समोरील काचेवर महाराष्ट्र विधानसभा सदस्य-आमदार असा मजकूर होता. त्यामुळे पोलिसांनी गाडीवरील लोगोबाबत चालकाकडे विचारणा केली असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याला गाडीसह तुर्भे पोलिस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली. त्यानंतर त्याने त्याचे नाव इंदरप्रीत ढिल्लोन असल्याचे व सध्या तो वाशी येथील एका खासगी कंपनीत नोकरीला असल्याचे सांगितले. गाडीवर आमदाराचा लोगो आणि राजमुद्रा लावण्यामागील कारण विचारले असता, पोलिसांनी गाडी अडवू नये किंवा कोणी चौकशी करू नये, यासाठी हा लोगो लावल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी इंदरप्रीत ढिल्लोन याच्या विरोधात खासगी वाहनावर अधिकृत राजमुद्रेचा आणि आमदार असल्याचे दर्शविणाऱ्या चिन्हाचा वापर करुन लोकसेवक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.