‘एसएमबीटी’च्या आरोग्य शिबिरास मुदतवाढ

‘एसएमबीटी’च्या आरोग्य शिबिरास मुदतवाढ

Published on

नाशिक, ता. १५ : परवडणारा खर्च आणि गुणवत्तापूर्ण उपचारामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो रुग्ण धामणगाव (ता. इगतपुरी) येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही १ जुलै ते ३० सप्टेंबरदरम्यान झालेल्या आरोग्यसाधना शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या शिबिराला मुदतवाढ देण्यात आली असून ३१ ऑक्टोबरपर्यंत शिबिरातील लाभ रुग्णांना दिले जातील, अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली.

यंदा या शिबिरात अवघ्या तीन महिन्यांत पावणेदोन लाख रुग्णांवर उपचार आणि चार हजारांहून अधिक जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या. यातील बहुतांश शस्त्रक्रिया महात्मा फुले आणि पंतप्रधान जनआरोग्य योजना अंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. आरोग्यसाधना शिबिरात रुग्णांच्या सर्व आजारांची तपासणी, उपचार आणि विविध शस्त्रक्रिया मोफत करण्यात येत आहेत. प्रत्येक व्यक्तीला आरोग्यदायी जीवन जगता यावे, तसेच कुठलीही व्यक्ती आरोग्यसेवा, सुविधा यापासून वंचित राहू नये, हा आरोग्यसाधना शिबिराचा मुख्य उद्देश आहे.

सरकारी योजनांमध्ये न बसणाऱ्या शस्त्रक्रियादेखील अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आल्याने आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांनी केवळ नाममात्र दरात असलेली औषधे आणि इतर तपासण्यांच्या खर्चात उपचार केले. शिबिरात यावर्षी रुग्णालयाकडून शस्त्रक्रिया शुल्क, डॉक्टर, परिचारिका, रुग्णालय, भूलतज्ज्ञ शुल्क व जेवण पूर्णपणे मोफत देण्यात आले. या शिबिराचा तीन महिन्यांत तब्बल एक लाख ५४ हजार २८९ रुग्णांनी लाभ घेतला. यामध्ये आठ हजार ७९९ रुग्णांवर आंतररुग्ण विभागात उपचार करण्यात आले, तर तीन हजार ६५७ रुग्णांवर क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या शस्रक्रिया झाल्या. विशेष म्हणजे, हृदयविकार विभागात एक हजार १२७ हृदयविकार शस्रक्रिया, १४५ बायपास शस्रक्रिया झाल्या आहेत. एसएमबीटी हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर २४ तास उपलब्ध होते. येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्यासाठी नागपूर, भंडारा, अमरावती, गोंदिया, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आता माजी व कार्यरत केंद्रीय कर्मचारी, आयएसपी, सीएनपी, तसेच एमएसईबी कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस उपचार सुविधा उपलब्ध आहे. यासोबतच नामांकित कंपनीच्या विमाधारकांनादेखील याठिकाणी २६ वेगवेगळ्या विभागांच्या सेवांचे उपचार कॅशलेश पद्धतीने घेता येणार आहेत.
- सचिन बोरसे, सीओओ, एसएमबीटी हॉस्पिटल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com